Monday, 27 Feb 2012
You are here: Home
मायक्रोसॉफ्ट ऑफिस PDF Print E-mail

मायक्रोसॉफ्ट ऑफिस (इंग्लिश: Microsoft Office) हा विविध कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त अश्या उपयोजन सॉफ्टवेअरांचा संच आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स या संगणकप्रणाल्यांसाठी हा सॉफ्टवेअर संच बनवला व वितरला आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसाची विंडोज प्रणाल्यांसाठी सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१० आहे, तर मॅकिंटॉश प्रणाल्यांसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०११ (मॅक) ही आवृत्ती आहे.

१ घटक सॉफ्टवेअर
२ मायक्रोसॉफ्ट वर्ड
३ मायक्रोसॉफ्ट एक्सेल
४ मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंट
५ मायक्रोसॉफ्ट आउटलूक
६ बाह्य दुवे
 

 घटक सॉफ्टवेअर
मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये खालील घटक सॉफ्तवेअरे समाविष्ट आहेत:

मायक्रोसॉफ्ट वर्ड
मायक्रोसॉफ्ट एक्सेल
मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंट
मायक्रोसॉफ्ट आउटलूक

मायक्रोसॉफ्ट वर्ड (इंग्लिश: Microsoft Word;) हे एक लेखन-संपादन कामकाजाचे उपयोजन सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. हे सॉफ्टवेअर इ.स. १९८३ साली मल्टी-टूल वर्ड या नावाने झेनिक्स संगणक प्रणाल्यांसाठी बाजारात आणलेल्या लेखन-संपादन सॉफ्टवेरापासून उत्तरोत्तर विकसत गेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट वर्ड २०१० ही आहे.
हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस संचातील खासकरून 'लेखन-संपादन' कामासाठी लिहिलेले सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअराचा .डॉक (.doc) हा फॉरमॅट संगणक लेखन दस्त‌ऐवजांमध्ये प्रमाण फॉरमॅट म्हणून गणला जाण्याइतका लोकप्रिय झाला आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअरात मराठी लिहिण्यासाठी अनेक 'फाँट', अर्थात संगणक टंक, उपलब्ध आहेत.

मायक्रोसॉफ्ट एक्सेल (इंग्लिश: Microsoft Excel) हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले, विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी वितरलेले स्प्रेडशीट उपयोजन सॉफ्टवेअर आहे. ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस या सॉफ्टवेअर संचामधील एक घटक सॉफ्टवेअर असून यात वापरकर्त्यांना साधी, गुंतागुंतीची गणिते, स्तंभालेख, व्हीबीए प्रोग्रॅमिंगदेखील करण्याची सुविधा पुरवली आहे. इ.स. १९९३ साली बाजारात आलेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल ५ व्या आवृत्तीपासून हे सॉफ्टवेअर विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स प्रणाल्यांवरील स्प्रेडशीट सॉफ्टवेअरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे.
हे गणिते, स्तंभालेख इत्यादी करण्यासाठी, लेखा राखण्यासाठी उपयुक्त असे उपयोजन सॉफ्टवेअर आहे. कार्यालयांमध्ये केल्या जाणार्‍या गणन क्रियांसाठी हे सॉफ्टवेअर लोकप्रिय ठरले आहे.

मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंट (इंग्लिश: Microsoft PowerPoint;) हे एक माहितीच्या सादरीकरणासाठी वापरले जाणारे उपयोजन सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०१० ही आहे. मॅकिंटॉशसाठी सद्य आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०११ मॅकसाठी ही आहे.

मायक्रोसॉफ्ट आउटलूक (इंग्लिश: Microsoft Outlook) हे एक ईमेलांच्या देव-घेवीसाठी व ईमेल व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे उपयोजन सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट आउटलूक २०१० ही आहे.
हे विपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी व व्यवस्थापनासाठी उपयुक्त असलेले उपयोजन सॉफ्टवेअर आहे.